*निवेदन*
*संदर्भ :अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ निकाल*
*IAS Exam.2023 Result*
*राज्यस्तरीय भारतीय अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी २०२३* चा निकाल hasatkhelat.comया वेबसाईट वरती आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.
http://hasatkhelat.com या वेबसाईटमध्ये होमपेज वर *ABIRUP EXAM* हे हेड आहे. त्यामध्ये गेल्यानंतर *IAS 2023 RESULT* यावरती क्लिक करा व तुम्हास परीक्षेदिवशी घरी मिळालेल्या *कार्बनलेस उत्तर पत्रिकेवरील* विद्यार्थ्यांचा आठ अंकी *बैठक क्रमांक (सीट नंबर)* नोंदवून सबमिट केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल.
परीक्षे दिवशी *ऐनवेळी वेळी प्रवेश घेतलेला विद्यार्थ्यांनी (ऑफलाईन विद्यार्थी)* तुम्हाला परीक्षे दिवशी घरी मिळालेल्या *कार्बनलेस उत्तरपत्रिकेच्या पेपर क्रमांक -१* वरील आठ अंकी *बैठक क्रमांक(सीट नंबर)* नोंदवून निकाल पाहता येईल.
निकालामध्ये *पेपर-१ व पेपर-२ चे गुण , एकूण गुण, मिळालेले शेकडा गुण व ग्रेड* देण्यात आली आहे.
तुम्ही पाहिलेला निकाल, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, माध्यम यामध्ये काही दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्तीचा तपशील वेबसाईट मधील याच निकालाच्या वर लाल रंगांमध्ये दिलेल्या *रिपोर्ट इशू* या बटणावरती क्लिक करा व तेथे दुरुस्तीची तपशीलवार माहिती भरून सबमिटच करा.
निकाल किंवा इतर बाबी मधील दुरुस्ती *गुरुवार दि. २३ मार्च २०२३* अखेर स्वीकारली जाणार आहे. त्या नंतर येणारी दुरुस्ती अंतिम निकालासाठी विचारात घेतली जाणार नाही.
सदर आलेल्या दुरुस्तींचा योग्य विचार करून राज्य, जिल्हा व केंद्र स्तरीय सर्व गुणवत्ता याद्या *दि. २७ मार्च २०२३* पूर्वी जाहीर करण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी *दि. ३० मार्च २०२३* नंतर याच वेबसाईट वरती विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक टाकून अपलोड करता येईल.
एप्रिलमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यां *गुणगौरव समारंभ* मान्यवरांच्या शुभहस्ते घेण्यात येईल. व त्यानंतर एप्रिल मध्येच जिल्हा व केंद्र गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व ट्रॉफी सन्मापूर्वक देण्यात येतील..
*महत्वाचे: पुढल्या वर्षीची राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा २८ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे.*