राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) २०२२-२३ च्या आयोजनाबाबत....
संदर्भ: १. शासन निर्णय क्र. रामघो-२२१५/प्र.क्र.६९/२०१५/प्रशिक्षण, दि. १० जुलै २०१५
२. शासनाचे पत्र जा.क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१३४ / एस.डी.-६, दि. २३ जानेवारी २०२३ ३. या कार्यालयाचा ईमेल, दिनांक १६ फेब्रुवारी २०२३
उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्थिती जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) चे आयोजन दि. १७ मार्च २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, यांचेमार्फत करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण चाचणीचे स्वरूप, दिनांक व वेळ पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे.
सदर सर्वेक्षण हे मराठी माध्यमासाठीच्या शाळांमध्ये होणार असून प्रथम भाषा आणि गणित
दोन विषयामधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असणार आहे.
संदर्भ क्र. ५ नुसार सदर सर्वेक्षणाची पूर्वतयारीम्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर प्रत्येकी २ अधिकारी) या कार्यालयातील प्रत्येकी दोन अधिकारी (वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता) यांची जिल्हा समन्वयक (SLAS) म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी एका तालुका समन्वयकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व जिल्हे) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण. मुंबई यांना जिल्हानिहाय इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या शाळांची यादृच्छिकपणे निवड करून यादी कळविण्यात आलेली आहे. यादीतील प्रत्येक शाळेसाठी १ याप्रमाणे क्षेत्रीय अन्वेषक (FI) यांची निवड करण्याबाबाबत कळविण्यात आलेले आहे. जिल्ह्यासाठी एकूण निवडण्यात आलेल्या क्षेत्रीय अन्वेषकांच्या संख्येनुसार ५ टक्के क्षेत्रीय अन्वेषक राखीव ठेवण्यात यावे. राज्य स्तरावरून जिल्हा समन्वयक यांना ऑनलाईन प्रशिक्षण दि. ०३ मार्च २०२३ रोजी देण्यात येईल. याबाबतची झुम लिंक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाच्या मेलवर एक दिवस अगोदर कळविण्यात येईल.. राज्यस्तरीय प्रशिक्षणानंतर जिल्हा समन्वयक यांनी तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांचे सर्वेक्षण विषयक प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात द्यावे.
क्षेत्रीय अन्वेषक निवड करताना खालील व्यक्तींची निवड करण्यात यावी..
१. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधकारी
२. विस्तार अधिकारी (शिक्षण)
३. केंद्र प्रमुख
४. BRC / URC साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक
५. अध्यापक विद्यालय अध्यापाकाचार्य व छात्राध्यापक
६. आवश्यकता भासल्यास प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक
मुख्याध्यापक व शिक्षक यांना त्यांची स्वत:ची शाळा सर्वेक्षणासाठी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. क्षेत्रीय अन्वेषक यांना मराठी भाषा अवगत असावी. त्याचबरोबर ज्या शाळा सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या त्या शाळेचा पट, माध्यम याची पडताळणी करण्यात यावी. निवड झालेल्या शाळेतील संबधित वर्गाचा पट ५ किंवा ५ पेक्षा कमी असल्यास किंवा माध्यम दुसरे असल्यास तसे परिषदेस कळवावे, परिषदेकडून सर्वेक्षणासाठी शाळा बदलून दिली जाईल..
सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व उपसंचालक, प्रादेशिक
विद्या प्राधिकरण, मुंबई यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), गट शिक्षणाधिकारी,
जिल्हा समन्वयक (SLAS) प्रशासनाधिकारी, तालुका समन्वयक (SLAS) यांच्या आवश्यकतेनुसार बैठका घेऊन नियोजन व आवश्यक ती कार्यवाही परिषदेच्या सूचनेनुसार करावी. सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळांना याबाबत अवगत करावे. प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या दिवशी निवड झालेल्या इयत्तेचे सर्व विद्यार्थी हजर राहतील याची दक्षता घ्यावी. सर्वेक्षणाच्या दिवशी सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत दहावी अथवा बारावी परीक्षा केंद्र असले तरी त्याठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे, मात्र दहावी अथवा बारावी परीक्षार्थीना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यावी. किंवा सकाळ सत्रामध्ये सर्वेक्षण करण्यात यावे.
सर्वेक्षणाचे साहित्य वितरण व संकलन याबाबत जिल्हा समन्वयक (SLAS) यांना whatsaap ग्रुपवर व मेलद्वारे कळविण्यात येईल..
अ) राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) च्या अनुषंगाने शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना द्यावयाच्या सूचना. १. दि. १७ मार्च २०२३ रोजी राज्य अध्ययन संपादणूक सर्वेक्षण (SLAS) करण्यात येणार आहे.
२. सदर सर्वेक्षण इयता ३ री, ५ वी व ८ वी च्या वर्गाचे करण्यात येणार आहे.
३. सदर सर्वेक्षण हे तणावमुक्त वातावरणात घेण्यात येईल याची काळजी घ्यावी. ४. सदर सर्वेक्षण म्हणजे परीक्षा नाही. यातून विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूकस्थिती जाणून घेतली जाणार आहे. तसेच विद्यार्थीनिहाय गुण कुठेही प्रसिद्ध केले जाणार
५. यासाठी इयता ३ री ५ वी ८ वी चे वर्ग असलेल्या शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने(Randar Sampling) राज्यस्तरावरून निवडण्यात आलेल्या आहेत.
६. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेली आहे, हे जिल्हा शिक्षण वप्रशिक्षण संस्था / प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांचेकडून कळविण्यात येईल. ७. यामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत, खाजगी अनुदानित, आदिवासी विभाग, समाजकल्याण, कटक मंडळ या व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश असणार आहे.
८. शाळा प्रमुखांनी सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी आपल्या सर्व स्टाफसह शाळेच्या वेळेत शाळेत शाळेमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य असेल.
९. विद्यार्थी सर्वेक्षणासाठी एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.
१०. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्ततुकड्या असतील तर त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाईल.
११. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (RandomSampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.
१२. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुनानिवड करण्याची आवश्यकता नाही.
१३. सर्वेक्षणासाठी निवड केलेल्या शाळांमध्ये निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी सर्वेक्षणाच्या दिवशी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात.
१४. क्षेत्रीय अन्वेषक यांना आवश्यक ती माहिती वेळीच उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे
१५. सर्वेक्षण दिवशी सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक उपस्थित राहून नमुना निवडीची प्रक्रिया संपवून विहित वेळेत सर्वेक्षण कार्य पार पाडतील. निवडलेल्या विद्यार्थ्यांना SLAS ID देऊन बैठक व्यवस्था करतील.
१६. विद्यार्थी राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक चाचणीच्या उत्तराचे प्रतिसाद OMR शीटवर नोंदविणार आहेत.
१७. सर्वेक्षणासाठी पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती तयार ठेवावी..
१) शाळा UDISE क्रमांक
२) विद्यार्थी हजेरी पत्रक
३) इयत्तानिहाय पट (मुले+मुली)
४) मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी
५) कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी, इमेल आय. डी.
६) शाळा माध्यम:-
७) इयत्ता व तुकडी संख्या :-
८) शाळा व्यवस्थापन प्रकार
९) ग्रामीण / शहरी :-