अव्ययीभाव समास:
सामासिक शब्दातील पहिले पद बहुधा अव्यय असते. महत्त्वाचे असते. सबंध शब्द क्रियाविशेषणाचे काम करते, तेव्हा तो अव्ययीभाव समास असतो.
अव्ययीभाव समासाची उदाहरणे
सामासिक शब्दविग्रह
१) आजन्म -जन्मापासून
(२) आमरण- मरेपर्यंत
(३) आजीव -जीव असेपर्यंत
(४) आकंठ-कंठापर्यंत
५) प्रति = प्रत्येक
६) प्रतिक्षण-प्रत्येक क्षणी
७) प्रतिदिन -प्रत्येक दिवशी
८) प्रतिवर्ष-प्रत्येक वर्षी
९)यथाशक्ती-शक्तीप्रमाणे
१०)यथामती - मतीप्रमाणे
११) यथाविधी - विधीप्रमाणे
१२) यथाक्रम - क्रमाप्रमाणे
१३) दरमजल -प्रत्येक मजल (मैल)
१४) दरसाल - प्रत्येक साली
१५) दररोज - प्रत्येक दिवशीहर फारसी उपसर्ग
१६) हरघडी - प्रत्येक घडीला
१७) हररोज - प्रत्येक दिवशी
१८) बेभान - भानावाचून
१९)बेशिस्त - शिस्तीवाचून
२०) बेलगाम - लगाम नसलेला
२१) बेकायदा - कायदयावाचून
२२) बिनशर्त - शर्तीवाचून
२३) बिनचूक - चुकीवाचून
२४) बिनधास्त - धास्तीवाचून
२५) बिनपगारी- पगारावाचून
२६) गैरशिस्त - शिस्तीवाचून
२७) गैरलागू -लागू नसलेला
२८) गैरहजर -हजर नसलेला
२९) गावोगाव - प्रत्येक गावात
३०) गल्लोगल्ली - प्रत्येक गल्लीत
३१) पावलोपावली - प्रत्येक पावलाला
2) तत्पुरुष समास व त्याचे उपप्रकार
या समासात दोन शब्दांतील विभक्तिप्रत्यय किंवा शब्द काढून त्यांना एकत्र जोडलेले असते. या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते. कारण पुढे लागणारे विभक्तिप्रत्यय दुसऱ्या शब्दाला लागतात. उदा., राजवाडा - राजवाड्याचे.
तत्पुरुष समासाचे,
(१) विभक्ती तत्पुरुष
(२) उपपद तत्पुरुष
(२) नत्र तत्पुरुष
(४) कर्मधारय
(५) द्विगू
(६) मध्यमपदलोपी इत्यादी प्रकार असतात.
(१) विभक्ती तत्पुरुष
उदाहरणे
सामासिक शब्द - विग्रह
१) तोंडपाठ - तोंडाने पाठ
२) विद्यालय - विद्येसाठी आलय
३) कर्जमुक्त - कर्जापासून मुक्त
४) सूर्यप्रकाश - सूर्याचा प्रकाश
५) वेदपारंगत - वेदात पारंगत
६) द्रव्यसाध्य - द्रव्याने साध्य
७) ईश्वरनिर्मित - ईश्वराने निर्मिलेले
८) बुद्धिजड - बुद्धीने जड
९) मातृसदृश - मातेशी सदृश
१०) मतिमंद - मतीने मंद
११) चिंताग्रस्त - चिंतेने ग्रस्त
१२)कष्टसाध्य - कष्टाने साध्य
१३) पितृसदृश - पित्याशी सदृश
१४) अनाथाश्रम - अनाथांसाठी आश्रम
१५) कार्यालय - कार्यासाठी आलय
१६) पोळपाट - पोळीसाठी पाट
१७) देवालय - देवासाठी आलय
१८) विद्यागृह - विदयेसाठी गृह
१९) क्रीडांगण -क्रीडेसाठी अंगण
२०) व्यवहारोपयोगी - व्यवहारासाठी उपयोगी
२१) कृष्णार्पण - कृष्णाला अर्पण
२२) ब्राह्मणभोजन - ब्राह्मणांना भोजन
२३) चोरभय - चोरापासून भय
२४) सेवानिवृत्त - सेवेतून निवृत्त
२५) ऋणमुक्त - ऋणातून मुक्त
२६) पदच्युत - पदापासून च्युत
२७) जन्मखूण - जन्मापासूनची खूण
२८) जन्मखोड - जन्मापासूनची खोड
२९) राजपुत्र - राजाचा पुत्र
३०) ज्ञानोदय - ज्ञानाचा उदय
३१) धर्मवेड - धर्माचे वेड
३२) पिंपळपान - पिंपळाचे पान
३३) घरधनी - घराचा धनी
३४) घंटानाद - घंटेचा नाद
३५) सागरकिनारा - सागराचा किनारा
३६) देशसेवा - देशाची सेवा
३७)राष्ट्रभक्त - राष्ट्राचा भक्त
३८)मनोराज्य - मनाचे राज्य
३९) तंत्रज्ञान - तंत्राचे ज्ञान
४०)भाग्योदय - भाग्याचा उदय
४१) कर्मकुशल - कर्मात कुशल
४२) कुलोत्पन्न - कुळात उत्पन्न
४३) गृहकलह - गृहातील कलह
४४) वनभोजन - वनातील भोजन
४५) प्रवाहपतित-प्रवाहात पतित (पडलेला )
४६) स्वर्गवास - स्वर्गातील वास
2)उपपद तत्पुरुष
१)द्विज - दोनदा जन्मणारा
(२) कुंभकार - कुंभ (घडे) करणारा
(३) गृहस्थ - गृहात राहणारा
(४) लेखक - लेखन करणारा
(५) शेतकरी - शेत करणारा
६) जलद - जल देणारा
(७) वारकरी - वारी करणारा
(८) कथेकरी - कथा करणारा
3)नत्र तत्पुरुष
(१) अज्ञान - नाही ज्ञान
(२) अपुरा - नाही पुरा
(३) अनादर - नाही आदर
(४) अयोग्य -नाही योग्य
(५) अन्याय -नाही न्याय
(६) अक्षय -नाही क्षय
(७) अहिंसा - नाही हिंसा
(८) अचल - नाही चल
4)कर्मधारय
ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे एकाच विभक्तीत, म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात त्याला कर्मधारय समास म्हणतात
(१) महादेव -महा असा देव
(२) खडीसाखर - खडी अशी साखर
(३) पीतांबर -पीत असे अंबर
(४) तांबडमाती -तांबड अशी माती
५) पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष
६) भाषांतर -अन्य अशी भाषा
७) देशांतर -अन्य असा देश
८) वेशांतर -अन्य असा वेश
९) श्यामसुंदर - श्याम सुंदर असा
१०) पांढराशुभ्र -पांढरा शुभ्र असा
११) कृष्णधवल - कृष्ण-धवल असा
१२) हिरवागार - हिरवागार असा
१३) लाललाल - लाल लाल असा
१४) वज्रदेह - वज्रासारखा देह
१५) चंद्रमुख -चंद्रासारखे मुख
१६) नरसिंह - सिंहासारखा नर
१७) कमलमुख - कमलासारखे मुख
१८) सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र
१९) कुपुत्र -कु (वाईट) असा पुत्र
२०) सुयोग - सु (चांगला) असा योग
२१) कुयोग -कु (वाईट) असा योग
२२) काव्यामृत - काव्य हेच अमृत विद्या हेच धन
२३) विद्याधन- विद्या हेच धन
२४) यशोधन - यश हेच धन
२५) पंचारती -पाच आरत्यांचा समूह
२६) नवरात्र - नऊ रात्रींचा समूह तीन भुवनांचा समूह
२७) त्रिभुवन -तीन भुवनांचा समूह
२८) पंचपाळे -पाच डब्यांचा समूह
२९) नवग्रह -नऊ ग्रहांचा समूह
३०) पंधरवडा -पंधरा दिवसांचा समूह
5)मध्यमपदलोपी :
मध्यमपदलोपी समासाची खालील उदाहरणे व त्यांचे विग्रह पाहा
(१) कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे
(२) पुरणपोळी - पुरण घालून केलेली पोळी
(३) साखरभात - साखरयुक्त भात
(४) मावसभाऊ - मावशीकडून भाऊ
(५) चुलतभाऊ - चुलत्याकडून भाऊ
(६) आतेबहीण - आत्येकडून बहीण
दवंदव समास:
द्वंद्व समासात दोन्ही पदे सारख्याच महत्त्वाची असतात.
१) इतरेतर द्वंद्व :
(१) आईवडील - आई आणि वडील
(२) बहीणभाऊ - बहीण आणि भाऊ
(३) पतिपत्नी - पती आणि पत्नी
(४) डोंगरदऱ्या - डोंगर आणि दऱ्या
(५) नाकडोळे- नाक आणि डोळे
(६) अहिनकुल - अहि आणि नकुल
(७) ताटवाटी-ताट आणि वाटी
(८) नेआण - ने आणि आण
(९) पाटीपेन्सिल - पाटी आणि पेन्सिल
(१०) भीमार्जुन - भीम आणि अर्जुन
(२) वैकल्पिक द्वंद्व :
(१) धर्माधर्म -धर्म अथवा अधर्म
(२) विधिनिषेध - विधी किंवा निषेध
(३) खरेखोटे - खरे अथवा खोटे
(४)सत्यासत्य - सत्य किंवा असत्य
(५) बरेवाईट - बरे अथवा वाईट
(६) पासनापास - पास किंवा नापास
(७) चूकभूल - चूक अथवा भूल
(८) लहानमोठा - लहान किंवा मोठा
(९) भेदाभेद -भेद अथवा अभेद
(१०) तीनचार - तीन अथवा चार
३) समाहार दंवदव
(१) भाजीपाला - भाजी, पाला वगैरे
(२) मीठभाकर -मीठ, भाकर वगैरे
(३) चहापाणी-चहा, पाणी वगैरे
(४) पानसुपारी - पान, सुपारी वगैरे
(५) गंधफुले - गंध, फुले वगैरे
(६) शेलापागोटे - शेला पागोटे वगैरे
(७) दाणागोटा - दाणा, गोटा वगैरे
(८) गाईगुरे - गाई, गुरे वगैरे
(९) नदीनाले - नदी, नाले वगैरे
(१०) जीवजंतू - जीव, जंतू वगैरे
४. बहुव्रीही समास
या समासात दोन्ही पदांवरून निघणारा तिसरा अर्थ महत्त्वाचा असतो. उदा., नीलकंठ नील आहे कंठ ज्याचा असा तो शंकर येथे शंकर हा अर्थ मिळतो. तो महत्त्वाचा. सबंध शब्द कोणाचे तरी विशेषण असते. या समासाचे विभक्ती बहुव्रीही, नञ् बहुव्रीही आणि सह बहुव्रीही असे उपप्रकार असतात.
(१)लंबोदर - लंब आहे उदर ज्याचे असा तो गणपती
(२) अनंत - ज्याला अंत नाही असा तो परमेश्वर
(३) सफल - जे फलासह आहे असे ते कार्य
१)विभक्ती बहुव्रीही
१) प्राप्तधन -प्राप्त आहे धन ज्याला असा तो
(२) लब्धदृष्टी- लाभली आहे दृष्टी ज्याला असा तो
(३) लब्धप्रतिष्ठा - लाभली आहे प्रतिष्ठा ज्याला असा तो
(४) जितेंद्रिय - जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो
(५) दत्तधन -दिले आहे धन ज्याने असा तो
(६) कृतकृत्य -कृत्य केल्याने कृतार्थ आहे असा तो
(७) गजानन - गजाच्या मुखासारखे मुख आहे
(८) दशमुख -ज्याला असा तो दहा मुखे आहेत
(९) चौकोन -ज्याला असा तो चार आहेत कोन ज्याला असा तो
(१०) निर्धन - सोडून गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो
(११) निर्भय -सोडून गेले आहे भय ज्यापासून असा तो
(१२) गतवैभव -सोडून गेले आहे वैभव ज्याच्यापासून असा तो
(१३) चंदशेखर - चंद्र आहे शिखेत ( जटेत) ज्याचा असा तो
(१४) चक्रपाणि - चक्र आहे हातात ज्याचा असा तो
(१५) पद्मनाभ - पद्म आहे नाभीत ज्याच्या असा
१६) भीमादी -भीम आहे आदी ज्यात असे ते
(१७) कृपादी - कृप आहेत आदी ज्यात असे ते
(१८) पूर्णजल - पूर्ण आहे जल ज्यात असे ते
2) नञ् बहुव्रीही :
ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद नकारात्मक असते, त्याला नञ् बहुव्रीही नत्र समास म्हणतात.
बहुव्रीही समासाची खालील उदाहरणे व त्यांचे विग्रह पाहा :
(१) अनादी - नाही आदी ज्याला असा तो
(२) अनिकेत - नाही निकेत ज्याला असा तो
3) सह बहुव्रीही :
ज्या बहुव्रीही समासात, सामासिक शब्दाच्या पहिल्या पदावरून 'सह' असा अर्थ क्त होतो, त्याला सह बहुव्रीही समास म्हणतात. सह बहुव्रीही समासाची खालील उदाहरणे व त्यांचे विग्रह पाहा :
(१) सहकुटुंब -जो कुटुंबासहित आहे असा तो
(२) सहपरिवार -जो परिवारासहित आहे असा तो
(३) सांब -,जो अंबेसहित आहे असा तो
(४) सनाथ - जी नाथासहित आहे अशी ती
(५) सकाम - जी कामासहित आहे अशी ती
