शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

सर्वनाम

मराठीतील सर्वनामे :

मराठीत एकंदर नऊ सर्वनामे आहेत. ती पुढीलप्रमाणे : मी, तू, आपण, स्वतः, तो, हा, जो, कोण, काय.

सर्वनामांचे प्रकार :

या नऊ सर्वनामांचे आणखी सहा उपप्रकार होतात :

(१) पुरुषवाचक सर्वनाम: 

                  बोलणाऱ्याच्या (किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने बोलणारा, ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो असे तीन भाग पडतात. त्यालाच 'पुरुष' असे म्हणतात व त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. ती पुढीलप्रमाणे :

(अ) प्रथम पुरुष : 

               बोलणारी व्यक्ती स्वतःविषयी बोलते तेव्हा वापरले जाणारे सर्वनाम म्हणजेच प्रथमपुरुषी सर्वनाम होय. 

           उदा.   मी ,आम्ही ,आपण ,स्वत: 

(घ) द्वितीय पुरुष : 

                   बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलत असते त्याच्यासाठी वापरलेले सर्वनाम हे द्वितीयपुरुषी सर्वनाम असते

उदा. तु, तुम्ही, आपण,स्वतः

(क) तृतीय पुरुष : 

                  बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते त्याच्यासाठी वापरलेले सर्वनाम हे तृतीयपुरुषी सर्वनाम असते.

तो, ती, ते, त्या

(२) दर्शक सर्वनाम    : दर्शक म्हणजे दाखवणारे. 

खालील वाक्ये पाहा :

एकवचन

हा नकाशा आहे. 

अनेकवचन

हे नकाशे आहेत.

जवळची वस्तू दाखवण्यासाठी 'हा' ही  व 'हे' या सर्वनामांचा उपयोग केला आहे. हा व हे ही अनुक्रमे एकवचन, अनेकवचन दाखवणारी सर्वनामे आहेत. त्याप्रमाणेच ही-हया, हे ही या एकवचनी, अनेकवचनी सर्वनामांचा उपयोग जवळची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो.

खालील वाक्ये पाहा एकवचन :

अनेकवचन

तो मजूर आहे. ते मजूर आहेत.

वरील वाक्यांत 'तो' ती 'ते'त्या ही दूरची गोष्ट दाखवणारी दर्शक सर्वनामे आहेत. अशा नेप्रकारे, ती-त्या, ते-ती या एकवचनी, अनेकवचनी दर्शक सर्वनामांचा उपयोग दूरची गोष्ट . दाखवण्यासाठी केला जातो.

(३) संबंधी सर्वनाम : वाक्यात दोन गोष्टींतील संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात.

खालील वाक्य पाहा

जो मनुष्य परिश्रम करतो तो मनुष्य यशस्वी होतो.

                        वरील वाक्यात जो व तो ही संबंधी सर्वनामे आहेत. ती दोन्ही 'मनुष्य' या एकाच गोष्टीबद्दल सांगत आहेत. म्हणून मनुष्य हे त्या दोघांचे पूर्वनाम आहे. जो हे संबंधी सर्वनाम आहे, कारण त्याच्याविषयी काही सांगितले जाते. तो हे मागाहून येणा म्हणून अनुसंबंधी आहे. जो आणि तो याप्रमाणे जी-ती, जे-ते, ज्या-त्या या संबंध सर्वनामांचाही उपयोग केला जातो.

(४) प्रश्नार्थक सर्वनाम : 

                              वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी

वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात.

खालील वाक्ये पाहा :

(१) कोण हा पाऊस !

(२) काय ही महागाई !

(३) कोण आहे ते तिकडे? 

(४) तुम्ही बाजारातून काय आणलेत ?

                  वरील वाक्यांत कोण व काय या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासा।ठी उपयोग केल आहे. ती प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. कोण?, काय ?, कोणास ?, कोणाला वगैरे कोण सर्वनामाचीच रूपे आहेत.

(५) अनिश्चित सर्वनाम: 

                      वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासार आले आहे हे सांगता आले नाही की त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

खालील वाक्ये पाहा : 

(१) कोणी म्हणतात यंदा पाऊस लवकर येईल. 

(२) तुम्ही काय म्हणाल ते खरे

            वरील वाक्यांत कोणी व काय ही दोन्ही सर्वनामे नेमक्या कोणत्या नामासाठी आली आहेत हे सांगता येत नाही. म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.

 (६) आत्मवाचक सर्वनाम: 

                                स्वत:विषयी उल्लेख करताना वापरल् जाणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात.

   स्वतः' व 'आपण' ही दोन्ही आत्मवाचक सर्वनामे आहेत.