शैक्षणिक ब्लॉगवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे, शेतकरी हायस्कूल, तारगाव 9870710255

शब्दयोगी अव्यय

 शब्दयोगी अव्यय:   

                         शब्दाला जोडून किंवा नामासोबत जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला 'शब्दयोगी अव्यय' असे म्हणतात '

उदा.

१. सायंकाळी मुले घराकडे गेली

 २. दगडाखाली विंचू आहे.

३. नदीजवळ गणपती मंदिर आहे. 

४. सूर्योदयापूर्वी पक्षी बाहेर पडतात

                वरील वाक्यात कडे, खाली, जवळ, पूर्वी  हे 'शब्दयोगी अव्यय' आहेत,

  *  शब्दयोगी अव्यय विभक्तीप्रमाणे काम करतात.

* शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतात व मूळ शब्दाचे सामान्यरूप होते.

 * ज्या शब्दयोगी अव्ययामुळे सामान्यरूप होत नाही त्यांना 'शुद्ध शब्दयोगी अव्यय' असे म्हणतात.

च,मात्र, देखील, पण, सुद्धा ही शब्दयोगी अव्यये आहेत